Thursday, December 24, 2009

स्वप्नातल स्वप्न


एक नविन चित्रपट.....
चित्रपटाचे नाव - स्वप्नातल स्वप्न.
कलाकार - मोतिराम पाटील , तेजस्विनी पाटील , अनंत सोनार , रुजुता सोनार, विनायक चौधरी.
दिग्दर्शक - मोतीराम पाटील.
निर्माता - मोतीराम पाटील.

द्र्ष १ -
अनंत आणि रुजुता यांचे नुकतेच लग्न झालेल! त्या निमीत्ताने एका मंदिरात एक पुजा आयोजीत केलेलि आहे. पुजे दरम्यान देवाच्या भक्ती मधे गुंग झालेली रुजुता न्रुत्य करत आहे. अनंत आणि नातेवाईक मंदिरात देवाच्या भक्ती मधे गुंग झालेली आहेत. हे सगळ सुरु आहे ते पाचोरा या गावाला हं!

द्र्ष २ -
मंदिराच्या अगदी समोरच विनायक चौधरी यांचे निवास स्थान आहे. विनायक चौधरी घराच्या गॅलरी मधुन देवाच्या भक्ती मधे गुंग झालेले आहेत.

द्र्ष ३ -
या सगळ्या कार्यक्रमासाठी बोलावलेले पाहुणे आहेत मोतीराम पाटील! हे पाहुणे अचानक कार्यक्रमा स्थळी येऊन पोचतात! पण सगळे जण देवाच्या भक्ती मधे इतके गुंग झालेले की यांच्याकडे कुणाचेच लक्ष नाही. पाहुणे आपले इकडे तिकडे बघुन आपल्याकडे कुणाचे तरी लक्ष जाईल याच अपेक्षेत उभे!

द्र्ष ४ -
मग थोड्या वेळानंतर रुजुताचेच लक्ष पाहुण्यांकडे जाते. मग होते संवादाला सुरुवात.
रुजुता - अरे एम् पी तु केव्हा आलास!
पाहुणे - हे काय चालतोच आहे.
रुजुता - बरं बरं, काय घेणार, चहा, काफी, सरबत?
पाहुणे - आता लगेच काही नको, लागेल तेव्हा मागुन घेईल मी. अन्या कुठे आहे?
रुजुता - तो काय समोरच आहे ना!

द्र्ष ५ -
मग पाहुणे अनंत जवळ जाऊन बसतात!
अनंत - अरे ये ये, कसा झाला प्रवास?
पाहुणे - विचारुच नको खुप हाल झालेत यार! ते सोड, अजुन किती वेळ आहे ही पुजा?
अनंत - माहीत नाहि यार, मी पण वाट पहातोय कधी संपेन ही पुजा त्याचि.
पाहुणे - बरं बरं, अजुन काय विशेष?
हे सगळे बोलणे चालु असताना, लांबुनच देव दर्शन घेत असतलेल्या विनायक चौधरींच्या लक्षात येते कि मोती आलेला आहे. ते बघुन विनायक उडी मारुन मंदीरात हजर होतो.
द्र्ष ६ -
मंदीरात येऊन अन मग देवाला नमस्कार करुन विनायक ची संवादाला सुरुवात होते.
विनायक - अरे मोती तु कधी आलास?
अनंत - अबे बराच वेळ झाला त्याला येऊन! तु गॅलरी मधे काय झोपा काढत होता काय?
विनायक - ये तु गप रे!
पाहुणे - अरे अरे भांडु नका रे. अरे विन्या मला येऊन १०-१५ मिनीटे झालीत. अजुन सांग तु लग्न कधि करतोय?
विनायक - करेल रे बाबा! तु आधी घरी चल!

द्र्ष ७ -
मग दोधे जण विनायक च्या घरी जातात आणी मग गप्पा सुरुच.
विनायक - ये आज तु इथेच मुक्काम करणार आहेस हा बाकी मला काही माहीत नाही.

द्र्ष ८ -
अचानक काहीतरी आवाज होतो आणि पाहुण्यांना जाग येते. मग मला कळते कि मी तर स्वप्नात होतो. बाजुला वळुन बघतो तर माझी सौ. तेजस्विनी शांत झोपलेली. मग मी छान स्मितपणे हसतो आणि पुन्हा झोपी जातो.

आता थोडे अस्तित्वात -
मग मोबईल मधला अलार्म वाजतो आणि मला खरोखर जाग येते. आणि मग कळते कि ते सगळे माझे स्वप्नातले स्वप्न होते.

5 comments:

  1. Khatarnak Moti...ekdam jabrya!

    Aai Shappath jar he sagala tu lihila asashil na( :) ajun thoda doubt aahe ki tu asa kahi lihu shakatos)... tar manana padega yaar..!

    ekdam sahi!

    ~ Anant

    ReplyDelete
  2. hahahahaahaha
    LOL
    I could not stop myself from laughing....
    ekdam besht!!!
    i should say..this is very well composed!! :)

    ~ Rujuta

    ReplyDelete
  3. प्रेक्षकांची प्रतिक्रिया -
    सम्पूर्ण कुतुम्बाने एकत्र जाऊन पहावा असा चित्रपट बरेच दिवसानी पहायला
    मिळाला. सर्वानिच खुप छान भूमिका केली आहे. तेजस्विनी पाटिल यांनी देखिल
    छोट्याश्या भूमिकेत छाप टाकली आहे. मोतीराम पाटिल यांच उत्कृष्ठ
    दिग्दर्शन प्रत्येक दृश्यात पहायला मिळत.

    आपला लाडका प्रेक्षक
    सरदार

    ReplyDelete
  4. wa wa... tumhi khup changle writer hou shakta

    Tejaswini - script madhil 1 patra

    ReplyDelete
  5. male aawadya..
    keep it up dude..

    - GiRiSh..

    ReplyDelete